copy paste

Saturday, December 30, 2017

#OldPostFromFacebook

"मम्मा, हम भाजीवाले है... तुमके लिए भाजी लाये है"

"पण हमको तुमकी भाजी नई आवडती ना", मला आवडतं त्याच्यासारखं हिंदी बोलायला! 😂😂
"हमकी भाजी बहोत छान है ना... हम उसमे सक्कर न्हाकते है!"
"अच्छा! बोलो कौनसी भाजी है" 😉
"हमके पास सब है मम्मा! गवार, सिमला मिरची, लेडी फिंगर, रेड टोमॅटो, ब्लू टोमॅटो... बहोत कलर्स वाली भाजी है..."
"अरे वा... फिर हमको ब्लू टोमॅटो का झाड दो ना, हम घरमेच भाजी लागयेंगे" 🙄🙄
"हमको झाड नई बनवता आता है मम्मा! हमको सिर्फ खाना, खेलना, स्कूल जाना आणि खोटी खोटी भाजी विकना आता है..."
"ओके. हम पैसा नही देंगे, हमके पास नही है" 😜😜

"हम मम्मा से पैसा नही लेते... तुम हमको चॉकोलेट दो, हम तुमको सब भाजी देंगा"

#ThisCrazyGuy #LoveHisHindi #AdorableBhajiwala #OnALighterNote #MommyDiaries

Tuesday, December 26, 2017

#OldPostFromFacebook

"मम्मा, मी खूप स्ट्रॉन्ग आहे! कुणालाच घाबरत नाही मी"
"अच्छा असं होय... मला वाटलं तू कॉक्रोचला घाबरतोस" 😒😒
"हो...थोडा थोडाच"
"आणि मांजरीचं काय रे?" 🙄🙄
"मी फक्त मांजर, कुत्रा आणि टायगरलाच घाबरतो मम्मा!"
"बरं" 😏😏
"पण मी कबुतर, चिऊ आणि काऊ ला अजिबात नाही घाबरत ना! जाऊ दे, तुला कळतंच नाही मम्मा " 😳😳

#MySelfProclaimedBodygurad #ThisCrazyGuy #OnALighterNote #MommyDiaries

Friday, December 22, 2017

#OldPostFromFacebook



This is how I keep him in check 😜😜
Santa's letter to Arham saying, be good I am on my way with your gifts 😂😂😂
Now it's my turn to say, can we have Christmas every month please 🤔🤔😉😉

Saturday, December 16, 2017

#OldPostFromFacebook

गेले दोन दिवस घरात जादूची कांडी फिरल्यासारखं वातावरण आहे...अर्हम सगळंच ऐकतोय(जवळपास) 😎
ऑबव्हिअसली, कारण आहे सांता गॉड 😜
"मम्मा, तू म्हणाली होतीस ना तू मला सांता गॉड च्या घरी नेणारेस"
"अरे कधी? मला तर असं काही आठवत नाहीए!" 😳😳
"म्हणाली होतीस तू! मला माहितीए"
"बरं मग त्याचं काय आता?" 😒
"आत्ता जायचं?"
"आत्ता ??? अरे तुला सांगितलं ना ते अलास्का ला आहे" 😳😳
"हो...मग काय झालं"
"हे बघ आत्ता तरी मला सुट्टी नाहीए आणि माझ्याकडे इतके पैसे पण नाहीएत सध्या" 😏😏
"मग आपण पटकन तुझ्या बाईक वरून जाऊ ना!"
"हिरो! बाईक नाही चालत बर्फात...तू पाहिलास ना तो विडिओ! कित्ती बर्फ होता तिथे"
"एक आयडिया आहे मम्मा... आपण जेसीबी घेऊन जाऊ! त्याला बर्फ पण काढता येईल ना" 😲😲
"खरंच की! पण रस्त्याचं काय?"
"मला माहित आहे मम्मा! फोर्टिन डेज स्टँडिंग लाईन(स्ट्रेट) च्या रस्त्यानी जायचं आणि मग गुगल मॅप्स सांगेल कोणत्या स्लीपिंग लाईन(टर्न) चा रस्ता" 🤐
"येस येस, मी ऑफिस वरून आले की जाऊ आपण!" 😒
पुणे ते अलास्का जेसीबी घेऊन जायचं याची कल्पना करणं सुद्धा शक्य नाहीए मला! 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️
आणि हा मला रोज आठवण करून देतो कल्पनेला मर्यादा नसते 😘😘

#ThisCrazyGuy #ChristmasTales #RoadTripBeyondImagination #OnALighterNote #MommyDiaries

Thursday, December 14, 2017

#OldPostFromFacebook

"राजा, ट्वेंटी नाईन नंतर थर्टी असतं रे" 😏
"नाहीच! ट्वेंटी टेन च असतं......मी असच म्हणणार आणि टीचरला पण असच म्हणायला सांगणार" 😳😳
"पण मी थर्टी च म्हणणार" 😠😠
"ओके मम्मा. पण फक्त आजच्या दिवस! उद्यापासून नाही"
"...."

#HelplessMommy #ThisCrazyGuy #OnALighterNote #MommyDiaries

Wednesday, December 13, 2017

#OldPostFromFacebook

"नको ना असं करु, तुझ्याच मुळे सगळा प्रॉब्लेम होतो" 😠😠

मी गालगुच्चा घेतलेला त्याला अजिबात आवडत नाही आणि मला प्रचंड आवडतं 😜😜
"बरं बाबा सॉरी, आता नाही करणार परत", अर्थात धडधडीत खोटं बोलत होते मी 😂😂
"आता माझ्या गालावर झाड येईल बघ"
"असं नाही होत राजा" 😲😲

"असच असतं. तुला माहीत नाहीए! मी आता तुला कधीच जेवायला देणार नाही, चिडलोय मी" 😒😒
"असं आहे का ? पण एक गम्मत सांगू ? स्वयंपाक तर मीच करते ना" 😛

"ठीके! मग मीच तू बनवलेलं काहीच खाणार नाही"
"बरं झालं आत्ताच सांगितलंस, मी आज गाजराचा हलवा बनवणार होते तुझ्यासाठी.. असू दे, माझ्यापुरताच बनवेन", मला जाम आवडतं त्याच्याशी खोटं खोटं भांडायला 😝😝

"मी पण खाणारे तो! पण आता मी तुला पांघरूण च नई देणार जा"
"मग आता मला थंडी वाजली तर ? असं करते मी नवीनच आणते" 😛

"ते नवीन मला दे, जुनं तू घे"
"मग आता आपलं भांडण कॅन्सल का ?"
"ब्रेक घेतलाय मी मम्मा"

"थँक यू थँक यू" 😍😍
"तरी पण तू मला थोडीच आवडतेस, सारखा काहीतरी प्रॉब्लेम करतेस तू!" 😒😒

हा प्रॉब्लेम सध्या तरी गाजराचा हलवाच सोडवेल बहुदा 😜😜

#ThisCrazyGuy #LoveThoseSillyFights #RelivingChildhood #OnALighterNote #MommyDiaries

Tuesday, December 12, 2017

#OldPostFromFacebook

"Mumma, here it is! Don't forget to send this letter to Santa God"...God, because we can't pronounce Clause you see 😉

"Sure thing son", I had no option but to accept the letter written to Santa 😒😒

Lucky guy, little did he know that he already handed it over to "Santa" 😜😜

"Mumma, do tell him that I have also drawn the pictures of those toys. I want exact same ones" 😊

"Definitely baby! I am sure it would be a great help!", sarcasm comes handy in such discussions 😏

And now, poor Santa is hunting for the tractor of his dreams amidst her stringent deadlines 😰😰

By the way, notice the word "urgent" ?? Realise how serious the matter is? I do! 😲😲


Sunday, December 10, 2017

#OldPostFromFacebook


"मम्मा, तापात रक्त का नाही येत?" 😳
"खरं सांगू का राजा, मला ना हे असले प्रश्न कधीच पडत नाहीत", माझे पेशन्स संपलेच होते 😒😒
"मी सांगतो ना!"
"सांगा" 😔😔
"अगं, तापाच्या जर्म्स ना रक्त नई बनवता येत"
"अच्छा! मग लागल्यावर कसं येतं रे रक्त!", जरा चिडूनच विचारलं मी 😠😠
"त्या जर्म्सना येतं ना रक्त बनवता"
"पण मला तर वाटलं की लागल्यावर आपल्या बॉडी मधून येतं रक्त!" 😏😏
"अंहं, अज्जिबात नाही"

नक्की काय करु मी याचं 😒😒😜😜

#OnALighterNote #HeHasAnswersToQuestionsWhichIDontEvenAsk
#HisOutOfTheWorldReasoning #GodSaveMedicalScience #MommyDiaries

Thursday, December 7, 2017

#OldPostFromFacebook

"आज काय केलंस स्कुल मध्ये बेटा?"
कितीही प्रेमाने विचारलं तरी या प्रश्नाला उत्तर मिळणं हे पूर्णपणे त्याच्या मूड वर अवलंबून असतं! 😏😏
 
पण म्हणून मी प्रयत्न सोडू शकत नाही ना 😜😜
"मम्मा, टीचरनी सांगितलं की आपण खाली टाकलं आणि तुटलं तर सॉफ्ट नाहीतर हार्ड" 😊
"अच्छा म्हणजे सॉफ्ट आणि हार्ड शिकवलं तर"
"हो. मम्मा एक विचारू?", खरंतर हे विचारायची पद्धत नाहीए त्याची पण त्याच्या मनात काय होतं कोण जाणे! 🙄🙄
"विचार की राजा"
"तुला हार्ड आणि सॉफ्ट येतं ना"
"हो"
"मग सांग, टिकली हार्ड की सॉफ्ट??" 🤔🤔
खरं उत्तर त्याच्या व्याख्येत बसवणं मला तरी शक्य नव्हतं त्या वेळी... 😒😒

 
"अरे आमच्या स्कूल मध्ये हे शिकवलंच नाही... तू उद्या तुझ्या टीचर ना विचारशील का", मी माझी सोयीस्कर सुटका करून घेतली 😜😜


Wednesday, December 6, 2017

#OldPostFromFacebook

तो त्या दिवशी फार प्रेमाने बोलत होता आणि माझं सगळं ऐकून घ्यायच्या मूड मध्ये होता. 😊
मग काय, त्याची फिरकी घ्यायची हुक्की अनावर झाली मला 😉
"मला फार कंटाळा आलाय रे स्वयंपाक करायचा", मी हळूच त्याला म्हंटलं
"मम्मा, मोठा झाल्यावर सगळं मीच करेन. भाजी मीच आणेन, सामान पण आणेन, स्वयंपाक मीच करेन आणि ऑफिसला पण मीच जाईन"
हे तो कायमच म्हणतो खरं तर.. पण बरं वाटलं ऐकून ! 😊
"कित्ती छान! अरे पण तोवर काय करू मग मी... तू मोठा व्हायला तर अजून खूप वेळ आहे" 😳😳
"मम्मा एक आयडिया आहे. पप्पा संडेला इडली बनवतील ना..." 😒😒
"पण मग मी रोज काय जेवायचं?" 🙄🙄
"तू फक्त संडेलाच जेव ना!"
मी निरुत्तर... 😏😏

हा त्याच्या शब्दाला खरंच जागला तरी एकंदरीत १५-२० वर्षं फक्त इडली आणि ती पण संडे ला हे जरा अतीच नाही होत का! 😰😰 😜😜

#HisSolutionsAreTrulyOutOfTheWorld #DontEvenKnowIfHeReallyLovesMe #OnALighterNote #MommyDiaries

Tuesday, December 5, 2017

#OldPostFromFacebook

"मम्मा, डेज ऑफ द वीक म्हणू?", जरा दचकलेच मी! सवय नाहीए अशा सुखद धक्क्यांची 😳😳😳
आज आकाशात सूर्य नसल्याचा परिणाम बहुतेक !
"म्हण की राजा" 😊
"मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फायडे, सिक्स डे, सेव्हन डे, एट डे, नाईन डे, टेन डे"
चूक त्याची नाहीए, बोबडं बोलण्यामुळे फ्रायडे चा फायडे झाला तर तो तरी काय करणार ना! 😒😒

#NumbToHisMistakes #WhenWordsFailToExpressWhatIFeel #OnALighterNote #MommyDiaries