copy paste

Thursday, September 28, 2017

#OldPostFromFacebook


"xxx ला मी पत्ता सांगितला आहे, ती आज घरी येणार आहे", दारात पाऊल ठेवल्या ठेवल्या अनाऊन्समेंट केली त्यानी !
"क्काय? जरा नीट सांगशील का?"

"अगं, ती xxx आहे ना तिला मी घरी बोलावलं आहे. मला भेटायचंय तिला"
"पण तू आत्ता तर तिच्याच बरोबर आलास ना van मध्ये! मग आता अजून काय भेटायचंय?", माझ्यातली आई... 😏😏
 
"अगं मला तिला आपलं घर दाखवायचंय, किती छान आहे ना आपलं घर!"
मला काही बोलायला संधीच मिळाली नाही 😷😷

 
"मी तिला सांगितलं आहे. straight आणि मग left-right-left आणि मग परत right"
हा मुलगा कॉन्फिडन्टली काहीही बोलू शकतो! 😒😒


"अरे राजा, हा पत्ता नाहीए आणि हे जे काही आहे ते चुकीचं आहे", मी वैतागलेच होते जरा
"मग मी तिला फोन करतो आणि सांगतो van काकांना सोडायला सांग. ते तिला शाळेत नेतील आणि मग तिथून त्यांना आपलं घर माहीत आहे ना!"

"नंबर आहे का तुझ्याकडे तिचा?", नंबर अर्थात नसणार होता पण मला त्याच्या उत्तराची जास्त उत्सुकता होती
"नाही, पण त्या फोनवाल्या aunty सांगतील ना"

"अरे पण तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलं??"
"अगं मला तुला सरप्राइस द्यायचं होतं ना मम्मा"

"देवा! मोठेपणी ह्यानी असं काही सरप्राइस दिलं तर....!" 😷😷

#OnALighterNote #Surprises #MommyDiaries

Wednesday, September 27, 2017

#OldPostFromFacebook

"मम्मा!", अत्यंत चिडलेला स्वर
"बोल", शांत राहायला जमायला लागलंय मला आता थोडं थोडं 😏😏
"मला सगळं तुझंच ऐकावं लागतं. सगळं तुझ्या प्रमाणे करावं लागतं"
चला, याला साक्षात्कार झाला म्हणायचा आणि "प्रमाणे" शब्द पण नक्की कसा वापरायचा तेही कळायला लागलंय...
"बरं मग?"

"तू तुझ्या मम्माकडे जा राहायला, तिला तुझी आठवण येते ना! जा मग तू!"
"चालेल, जातेच मी आता...पण मग तुम्हाला जमेल का जेवणाचं?"
"आम्ही इडली आणि पोहे करू, आम्हाला तितकंच येतं"
"अरे पण रोज तुला वेगवेगळं लागतं ना जेवायला ?"
"मग आम्ही रेस्टोरन्ट मधून आणू"
"बरोबर आहे, पण पैसे पुरतील का?"
"आम्ही ATM मधून आणू"
"आणि तू घरी एकटा कसा राहशील?"
"मी आता थोडा थोडा मोठा झालोय ना"

"अच्छा, सगळं ठरलंय तर मग"
"हो!"

आज त्याची खोड काढायचा चान्स माझा होता. पुढची ५-१० मिनिटे शांततेत गेली आणि मग मी खरंच बॅग काढली 😜
"काय करतीयेस?"
"बॅग भरते ना आता"
"माझे पण कपडे भर"

"अरे पण तू तर इथेच थांबणार आहेस ना", हसू आवरत मी विचारलं 😷
"तूच म्हणतेस ना मी तुझा छोटा बेबी आहे, मग एकटं सोडणार का मला"
"एकटा कुठे आहेस पण तू, पप्पा असतील ना" 😛
 
"त्यांना तर कॉर्न राईस पण नै येत, आणि छान स्टोरी पण नै सांगता येत!"
"अरे देवा, मग आता काय करायचं?"
"आपण त्यांनाच पाठवून देऊ नगरला, ते माझं काहीच नै ऐकत...", टार्गेट बदललं होतं 😷😷
 
"त्यापेक्षा आपण त्यांना कॉर्न राईस आणि गोष्ट सांगायला शिकवू ना, म्हणजे नेक्स्ट टाइम मला जाता येईल", मी सहजासहजी सोडणार नव्हते 😜😜
 
"पण तू मला एक नंबर आवडतेस ना", माझा पोरगा पुणेरी आहे! 😉
"मला पण"
कॉर्न राईस बनवता येणं कुठे उपयोगी येईल सांगता येत नाही 😉


#OnALighterNote #MummasBoy #CuteFights #BuildingRelations #MommyDiaries

Monday, September 25, 2017

#OldPostFromFacebook

"अरे राजा छातीला कसं लागलं पण?"
"मम्मा, तो xxx पळत आला आणि मग लागलं"
"तू तर बसला होतास ना.."
"अगं म्हणजे आधी बसलो होतो, मग पळायला लागलो आणि तो धडकला"
"म्हणजे दोघंही पळापळी खेळत होतात तर... असू दे आता पण इथून पुढे जरा जपून पळत जा म्हणजे लागणार नाही"
दोनच दिवस झाले होते आणि आज परत तेच! 😒😒
 
"आता हाताला कसं रे लागलं ? मारामारी करत होतात का?", मी जरा ओरडलेच
"मम्मा, दंगल हा गेम च असतो ना, आणि तू म्हणतेस ना गेम्स चांगले असतात"
हा वकील होणार बहुदा ! 😷😷
 
"बरं नक्की काय झालं?"
"म्हणजे मी आणि xxx खेळत होतो भिंतीच्या जवळ, तर तिला आवडलंच नाही. मग तिनेच मारलं मला"
अजिबात जमलं नव्हतं त्याला पण सांगून मोकळा झाला तो!
मी काही बोलणार इतक्यात पुढचा सल्ला मिळाला

"ऎक ना, आपण सगळ्या भिंती पाडायच्या का? किती अडचण होते. आणि मग मला नीट फोर पण नै ना मारता येत! पाडूच आपण"
"आपण असं करूयात ना, ग्राऊंड वरच राहायला जाऊ!", sarcasm शिवाय मला अशा गोष्टी हॅन्डलच करता येत नाही मला 😡😡
 
"किती मज्जा! आपण असच करू...." त्याला खरंच वाटलं
खरंतर claustrophobic मी आहे, पण हा विचार कधी शिवला सुध्दा नाही मला 🤕🤕

#MischievousKiddo #NeverArgueWithKids #ParentingTip #MommyNeedsTimeout #MommyDiaries

Sunday, September 24, 2017

#OldPostFromFacebook

"तुमहीच मुझे नही आवडते!"
"तुमका नाव क्या है?"
"सकाळको लंच किया था ना.."
"तुम मेरा कुछच नै सुनते"
"मुझकी पेन्सिल किधर है?"
"हमका पेट भऱ्या फिरभी तुम जेवनको क्यू देते?"
"मै तुमके पीछेच आ रहा है"
ज्यानी त्यानी आपापला अर्थ लावून घ्यावा... 😒😒😜😜

#OnALighterNote #NewLanguageIsFun #MommyDiaries #CuteImperfections

Wednesday, September 20, 2017

#OldPostFromFacebook

"Trust me mumma, aeroplanes cause rains”, I am immune to such shocks now 😏

“No baby”

“Yes mumma! Allow me to explain?” My son is unknowingly following path of Dushyant from “Sarabhai Vs Sarabhai” 😜

“Go ahead”, As if my answer mattered

“So its the aeroplanes which carry clouds from one place to another, and then they drop them. Clouds while falling down become water and thats nothing but rain!”

“And how clouds become water?”, I was hoping for water cycle in distorted form as an answer… Silly me! ☹️


“Magic mumma! Don’t you keep telling me about magics all the time”, came the boomerang 🙄🙄

“Tell me, when we see a plane from ground then can we see people inside??”

“No baby”

“So it is because the aeroplanes don’t have people inside it then, its all clouds that it is carrying!”

He was convinced with the answer he gave, did not bother if I accepted that or not 😊

Tuesday, September 19, 2017

#OldPostFromFacebook



What happens when reality hits hard? sheer heartbreak!
Yeah, we recently had our “first heartbreak” and yes we are still sad about it 😒
That was THE moment, when he realised that when a batsman hits a four then its more of an achievement of a batsman, worse yet, he was a bowler! 😑
But no, we haven’t quite accepted it. We are waiting for MSD to confirm that…
Why MSD?
Because he smiles at us through television whenever he looks at us, we are super delighted with the gesture 😉
Oh yes, we have yet another purpose of meeting him
While we decide if we like cricket more or its football, we want him(which means ALL) to play cricket with football
See, we are playing it fair…..😜
So, do help us get in touch with MSD, but only the “blue coloured” one!
Rest all aren’t as good you see 😐

#OnALighterNote #EncounterWithReality #SportsmanInMaking #CricketOrFootball #MommyDiaries

Wednesday, September 13, 2017

#OldPostFromFacebook

वय वर्षे - साधारण सव्वा चार
गृहपाठ - साधारण २५-३० अक्षरे ५-१० अंक ८-१० रेघोट्या (जोड्या जुळवा साठी)
वारंवारिता - आठवड्यातून एकदा ( हे सर्व पूर्ण करायला किमान २ ते ३ दिवस)
"मम्मा माझी neck फार दुखतीए"
"ओके बेटा, आपण थोड्या वेळाने करूयात गृहपाठ"


५ मिनिटांनी..
वय वर्षे - साधारण सव्वा चार आणि ५ मिनिटे
स्वअभ्यास - १०० ते १००० रेघोट्या आणि अगणित चित्रे (पृथ्वीवरील सर्व लेखनसाहित्य एका दिवसात संपवायचं ध्येय!)
वारंवारिता - दररोज
"राजा, नको करुस आत्ता, तुझी neck दुखत होती ना"

"मम्मा, अगं neck ला letters आणि numbers नाही आवडतं म्हणुन दुखते. आत्ता तर तिला खुप छान वाटतंय"
वाद घालायचा प्रश्नच नव्हता...

किंबहुना, मला लवकरच विरक्ती येईल असं वाटतंय! 😒😒
#PatienceTesting #MommyDiaries #KidsTheseDays

Wednesday, September 6, 2017

#OldPostFromFacebook

Last month was stressful, both mentally and emotionally.

While emotional self would take its time to fix, I decided to take on mental stress as I flipped calendar to September
Kid's holiday isn't the right day to work still decided to take a chance, just in case!
Surprisingly, things were not as bad as I thought

The little one was running around the house trying to find ways to catch my attention every 2 minutes, made sure he was in the same room 🙄🙄
But I am used to it, just like every other mother on the planet 😉
All of a sudden this guy went out of sight. Won't lie, I was happy!

And there he was, back in a minute, with a lightening smile on face and a flower in hand
Yes, there is a first(and only 😜) bloom of the season in our terrace garden and it is none other than Periwinkle

"Mumma smell this, it is amazing"
Either he was overjoyed or I had just met the first person in the universe who likes smell of Periwinkle 😒
 
"Yes darling", such lies don't hurt
"Would you wear this in your hair? Wait Mumma, let me do it for you"
All this happened in a fraction of second and I went from numbness to ecstatic in that timeframe!
"You look beautiful", he did not fail to compliment. Clearly, being in PJs with messy hair did not bother him

No, we do not watch much of Television and No, he did not see that happening around 😜
But surely he stole my heart, yet again!
Beauty lies in the eyes of beholder, I am so glad my son knows that already 😊

#LifeInMoments #ComplimentsFromKidsAreExtraSpecial #ILoveYouSon #MommyDiaries