copy paste

Wednesday, October 11, 2017

#OldPostFromFacebook

"मला अजिबात आवडलं नाहीए हे", रुसून बसला होता तो!
"अरे हिरो, इंडिया आणि ऑस्ट्रेलिया खेळत असताना पाकिस्तान कसं हरेल?" 😷😷
 
"पण मग पाकिस्तानला पण खेळू द्यायचं की..."
"हो रे, पण एका वेळी २ च टीम्स खेळतात ना. कसं करणार मग?" 🤔🤔
"दोन नै तीन! ते रेड ड्रेसवाले पण आहेत की!"
"ते अंपायर आहेत. match मध्ये कुणाला चीटिंग करू देत नाहीत. प्लेयर्सना भांडू देत नाहीत"

"ते कशाला? प्लेयर्सची मम्मा नै येऊ शकत का? मम्माला तर सगळे घाबरतात"
"आपण भेटणार आहोत ना धोनीला, तू त्यालाच विचार ना" 😒😒
"हो! मला त्याची कार पण बघायची आहे, तो match नंतर घरी कसा जातो मला माहीतच नाहीए. आणि आता तर त्याच्याकडे लायन पण आहे"

"अरे देवा, हे कुणी सांगितलं आता तुला?" 😱😱
"अगं त्या ऍड मध्ये आणला होता त्यानी त्याचा लायन"
"ठीक आहे, त्याला भेट मग घाल काय गोंधळ घालायचा तो!", आता मीच वैतागले होते 😏😏

"तुला माहितीए का मम्मा, डायनासोर मेले की परत नाही उठत, ऍनाकोंडा मेले की परत उठतात"
"एक मिनिट, आपण क्रिकेट बद्दल बोलत होतो ना! आणि काय रे, हा शोध कुठून लावलास तू??" 😓
"टीचरनी सांगितलं डायनासोर दिसत नाहीत आता, पण ऍनाकोंडा दिसतात, सांग मग हे कसं??"
"चुकलंच रे माझं, तू म्हणतोस तसंच असणार!" 🤐🤐
क्रिकेट ते अजरामर ऍनाकोंडा, एका मिनिटात.... वाचवा मला कुणीतरी! 😏😏

#OnALighterNote #CricketLove #MSDFan #MommyDiaries

No comments:

Post a Comment