copy paste

Saturday, January 20, 2018

"मम्मा, आत्ता 151 आहे, काल स्कूल मध्ये 154 होतं"

"नाही राजा, ते 15.1 आहे. 151 वेट नसतं रे लहान मुलांचं!", मी हसू आवरत म्हंटलं 😂😂😂

"नो मम्मा! मी आता थोडा थोडा मोठा आहे ना, मग माझं वेट 154 च आहे"  😠😠😠

"इतकं वेट दिसायला २ जणांना वेईन्ग स्केल वर दोघांना एकत्र उभं राहावं लागेल बेबी" 😮😮
"मग 51 आहे माझं वेट! चालेल?"

"नाही... आत्ता नाही, थोड्या वर्षांनी होईल ते" 😏😏

"मग 210 ?"

"अरे काय चाललंय हे????? 210 तर 154 पेक्षा जास्त असतं! तीन जणांना उभं राहावं लागेल" 😡😡😡

"असू देत! मीच ठरवणार माझं वेट, आणि ते 154 च आहे. आणि तू मला अजिबात आवडत नाहीस मम्मा"

"बरं बाबा... पण तरीपण मला सगळ्यात जास्त तूच आवडतोस" 😜😜😍😍

वेट साठी पण बार्गेनिंग असतं हे आजच कळलं मला! 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️

#WeightIsNotJustANumber #ThisCrazyGuy #OnALighterNote #MommyDiaries

No comments:

Post a Comment