copy paste
!->
Wednesday, January 3, 2018
आम्ही दोघं टीचर
"मम्मा, आपण दोघं मोठे झालो ना की टीचर बनू"
"क्काय?? म्हणजे मी मोठी नाहीए का आत्ता???" 😳
"अरे हो! मग असं कर तू अशीच थांब, मीच पटकन मोठा होतो आणि मग आपण बनू टीचर!" 😎
"चालेल. मी पेन्टिंग करेन, आणि मुलांना एरोप्लेन, बोट, हाऊस असं काही काही बनवायला शिकवेन" 😛
"हो, आणि मी नंबर्स शिकवेन मम्मा"
"त्यासाठी हंड्रेड पर्यंत तरी नंबर्स यायला हवे, तुला तर टेन पर्यंतच येतात ना?" 😷
"मग तू स्मॉल बॉईज ची टीचर हो, मी बर्डस चा टीचर होतो"
"बर्डस चा टीचर नसतो बाळा! आणि त्यांना काय शिकवणार तू?" 😱😱
"मी त्यांना फ्लायिंग आणि नेस्ट बनवायला शिकवेन"
"तुला कुठं येतं फ्लायिंग?" 😲
"अगं मम्मा, असे हात स्प्रेड केले की येतं फ्लाय करता!"
"आणि नेस्ट कशाला रे, त्यांना त्यांचं येतं बनवता??" 🙊
"त्याला डोअर आणि विंडो कुठे असतात गं! मी त्यांना सगळं शिकवणार आहे"
"तुला येतं ना पण नक्की?" 😏😏
"हो! मला सगळं येतं.."
देवा! त्याचा थोडा कॉन्फिडन्स मला पण दे 🙊🙊🙊
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment