copy paste
!->
Thursday, January 4, 2018
"मम्मा ला ताप आलाय तिच्याजवळ कुणीच नई जायचं! फक्त मीच जाणार कारण मी स्ट्रॉंग आहे म्हणून मला इन्फेक्शन होत नाही... ", त्यानी फर्मान सोडलं 👦
"थांब मी तुझ्या मम्माला औषध देते", त्याची नानी
"नानी! तू नई काही करायचं... ती माझी मम्मा आहे आणि मीच तिची मम्मा!", तो त्याच्या नानीशी कायम भांडतो या टॉपिक वरून 😂😂😂
"तू भांडू नकोस राजा, मी घेतलं ऑलरेडी औषध", मला मध्यस्थी करणं गरजेचं होतं 😏😏😏
"अरे यार, मम्मा तू कशाला घेतलंस औषध! गर्ल्स औषध नाही घेत, फक्त बॉईज घेतात"
"हा शोध कुठून लावलास रे! आणि मग गर्ल्स ना बरं नसेल तर त्यांनी काय करायचं ???", मी ओरडलेच जरा 😳😳
"मम्मा, गर्ल्सनी नुसतं झोपून राहायचं" 😊
"मग घरातली कामं कोण करणार" 😲😲
"मी करेन ना मम्मा"
"कित्ती गोड!" 😍😍
"मम्मा! तो फोन ठेव बाजूला आणि झोप आता", मी नवऱ्याला म्हणते ते वाक्य या हिरोनी जसं च्या तसं उचललं होतं! 😷😷
"बरं बाबा, झोपते" 😒😒
नंतर बराच वेळ हा छोटा शिलेदार पहारा देत होता
थोड्या दिवसांनी कदाचित मला भेटायला येणाऱ्या लोकांना याची परमिशन घ्यावी लागेल बहुतेक 🙊🙊
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment